राज्यातून मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत निरोप घेणार; शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही, पंजाबराव डख यांचा विजयादशमीनिमित्त मोठा दिलासा.
परभणी:
आज २ ऑक्टोबर २०२५, विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावर्षीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी नको नको केले होते, अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता हा परतीचा पाऊस राज्यातून निरोप घेणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी सर्व शेतकऱ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत सांगितले की, “राज्यात पावसाने खूप थैमान घातले, पण आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पाऊस आता निरोप घेणार आहे, वरुणराजा आता निघून जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही.”
पाऊस कधी आणि कुठून जाणार? संपूर्ण अंदाज
राज्यात आता मोठ्या किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही, असे स्पष्ट करत त्यांनी परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज दिला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
२ ते ४ ऑक्टोबर: या काळात राज्यात हवामान कोरडे राहून कडक ऊन राहील आणि सूर्यदर्शन होईल.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
४ ते ७ ऑक्टोबर: या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. हा पाऊस सर्वदूर नसून केवळ काही भागांपुरता मर्यादित असेल. याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात, म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दिसून येईल. तसेच वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, मात्र तो मोठा नसेल.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
७ ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास: काही भागांतून ७ ऑक्टोबरला, तर बहुतांश भागांतून १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस निरोप घेईल.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
१५ ऑक्टोबरला मान्सून पूर्णपणे जाणार: १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रातून निघून जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
सोयाबीन काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
ज्या शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी सुरू आहे, त्यांनी चिंता करू नये, असे डख यांनी सांगितले. “७ तारखेनंतर तुम्ही सोयाबीन काढू शकता. ३ आणि ४ तारखेला पूर्णपणे ऊन राहणार असल्याने तेव्हाही काढणी करता येईल. फक्त ४, ५ आणि ६ ऑक्टोबर दरम्यान दुपारनंतर तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो, त्यामुळे काढलेले सोयाबीन झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी,” असा सल्ला त्यांनी दिला.
आता थंडीची तयारी करा!
पावसाच्या निरोपाचे संकेत देताना डख म्हणाले की, ७, ८ आणि ९ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात धुई, धुके आणि धुरळी दिसेल. जेव्हा जाळी येते, तेव्हा समजायचे की १२ दिवसांत पाऊस निघून जातो. यानंतर राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, शेतकऱ्यांनी आता थंडीची तयारी करावी, कारण २ नोव्हेंबरपासून राज्यात तीव्र थंडी पडण्यास सुरुवात होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.