पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
Read More
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
Read More
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
Read More
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
Read More

बापरे सध्या देशात कापसाला किती मिळतोय तर पहा आजचे कापसाचे दर 1 October cotton rate

देशातील कापूस बाजार तेजीत; गुजरातमध्ये सर्वाधिक ८,४१० रुपये दर, तर मध्य प्रदेशात दर दबावात

प्रमुख बाजारपेठा, १ ऑक्टोबर:

देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये आज, १ ऑक्टोबर रोजी कापसाच्या दरात (Cotton Rate) तेजीचे चित्र दिसून आले. गुजरात, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या बाजारपेठांमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला, तर मध्य प्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये दर दबावात असल्याचे दिसून आले. गुजरातच्या ढोल बाजार समितीमध्ये कापसाला आज देशातील सर्वाधिक, म्हणजेच प्रति क्विंटल ८,४१० रुपयांचा कमाल दर मिळाला. बहुतांश प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्वसाधारण दर ७,००० रुपयांच्या वर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गुजरात, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानात तेजी कायम

आजच्या बाजारभावानुसार, गुजरातमध्ये कापसाच्या दरात प्रतीनुसार मोठी तफावत दिसली. एकीकडे ढोल बाजारात सर्वाधिक ८,४१० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर दुसरीकडे महुवा आणि राजुला येथे किमान दर ३,००० रुपयांपर्यंत खाली आला होता. असे असले तरी, सावरकुंडला (कमाल दर ७,८७५ रुपये), बगसारा (कमाल दर ७,८२५ रुपये), आणि हलवड (कमाल दर ७,८५० रुपये) या बाजारपेठांमध्ये कापसाला उत्तम भाव मिळाला. हरियाणातील आदमपूर (सर्वसाधारण दर ७,२७० रुपये), पंजाबमधील मलौट (सर्वसाधारण दर ७,१५० रुपये) आणि राजस्थानमधील गजसिंगपूर (सर्वसाधारण दर ७,२७१ रुपये) येथेही दर तेजीत होते. तेलंगणातील जम्मिकुंटा येथेही कापसाला ७,४२१ रुपयांचा स्थिर भाव मिळाला.

Leave a Comment